England’s win over New Zealand has reshaped the T20 World Cup semifinal race. Pakistan remain in contention
esakal
England vs New Zealand, T20 World Cup Marathi Update News: इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर ८ मधील अपराजित मालिका कायम राखली. त्यांनी न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय मिळवून ग्रुप २ मधून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. आता त्यांच्यासमोर भारत किंवा वेस्ट इंडिज यांच्यापैकी एक स्पर्धक मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. न्यूझीलंडने शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच नेताना आपला नेट रन रेट चांगलाच ठेवला. त्यामुळे आता पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी श्रीलंकेवर मोठा विजय मिळवावा लागेल.