England registered a dominant win over Sri Lanka in the T20 World Cup Super 8
esakal
Sri Lanka vs England T20 World Cup 2026 Super 8 match report: यजमान श्रीलंकेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ च्या पहिल्याच सामन्यात चाहत्यांना निराश केले. झिम्बाब्वेकडून झालेल्या पराभवातून ते बाहेर पडलेले दिसले नाही. इंग्लंडच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांनी ७ फलंदाज अवघ्या ६९ धावांवर गमावले. तिथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता, परंतु कर्णधार दासून शनाका मैदानावर उभा राहिला. पण, त्याचाही अप्रतिम झेल टिपला गेला अन् श्रीलंकेने सामना गमावला. इंग्लंडच्या या दणदणीत विजयाने पाकिस्तानच्या मनात घबराट पसरली आहे, कारण पुढील सामन्यात त्यांना इंग्लंडचाच सामना करायचा आहे.