Washington Sundar and David Miller exchange words during a tense IND vs SA encounter
esakal
David Miller Washington Sundar verbal spat explanation: डेव्हिड मिलर व डेवॉल्ड ब्रेव्हिस या जोडीने टीम इंडियाच्या हातून सामना खेचून नेला, हे जगजाहीर आहे. ३ बाद २० धावसंख्या असताना ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि ९७ धावांची भागीदारी करताना दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थितीत आणले. मिलरला बाद करण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय गोलंदाजांकडून मग मुद्दाम भांडणं उकरली गेली आणि त्यामुळेच वॉशिंग्टन सुंदर व आफ्रिकेच्या फलंदाजांमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. मिलर ३५ चेंडूंत ६३ धावा चोपून माघारी परतला, परंतु त्याने दिलेले व्रण भारताच्या मनावार कायमचे बिंबवले गेले.