IND vs PAK :'हस्तांदोलन' न करणे हा भारताने सुरू केलेला मुर्खपणा! Sanjay Manjrekar यांची वादग्रस्त पोस्ट; काहींचा सपोर्ट, तर काही विरोधात; तुमचं काय मत?

Sanjay Manjrekar handshake controversy India vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्याच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “हस्तांदोलन न करणे हा भारताने सुरू केलेला मुर्खपणा आहे,” असे मत व्यक्त केले आहे.
Sanjay Manjrekar’s remarks on the India-Pakistan handshake issue ignite heated debate among cricket fans.

Sanjay Manjrekar’s remarks on the India-Pakistan handshake issue ignite heated debate among cricket fans.

esakal

Updated on

India Pakistan cricket spirit controversy latest update: आज कोलंबो येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना होणार आहे आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने सुरू केलेली हस्तांदोलन न करण्याची परंपरा याही सामन्यात दिसणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव नाणेफेकीच्या वेळी पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा याच्याशी औपचारिक हस्तांदोलनासाठी हात पुढे करण्याची शक्यता कमी आहे. बांगलादेशला वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर काढण्यात आल्यानंतर पाकिस्तानने यापूर्वी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती, परंतु गेल्या आठवड्यात त्यांनी माघार घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com