T20 World Cup, India vs West Indies Marathi
esakal
India vs West Indies Super 8s Marathi Cricket Updates : इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड हे उपांत्य फेरीत पोहोचणारे तीन संघ निश्चित झाले आहेत आणि चौथ्या स्थानासाठी भारत-वेस्ट इंडिज यांच्यात लढत रंगणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८चा शेवटचा सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे आणि भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला विजेता संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. त्यामुळे या सामन्याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे आणि या सामन्यातील विजेत्या संघाला फायनलसाठी इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे.