T20 WC 2024 Drop In Pitches : भारत - पाकिस्तान सामन्यातील खेळपट्टीनं केला तब्बल 22,500 Kms चा प्रवास

T20 World Cup 2024 Drop In Pitches
T20 World Cup 2024 Drop In Pitches esakal

T20 World Cup 2024 Drop In Pitches : टी 20 वर्ल्डकप 2024 चे काही सामने हे अमेरिकेत होणार आहेत. या सामन्यांसाठी ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर करण्यात येणार आहे. या खेळपट्ट्या ऑस्ट्रेलियातून अमेरिकेत दाखल झाल्या आहेत. बीसीसीने दिलेल्या माहितीनुासर या खेळपट्ट्यांनी जवळपास 22,500 किलोमीटरचा प्रवास केला असून या खेळपट्ट्या जहाजाने अमेरिकेत दाखल झाल्या आहेत. यातील एका खेळपट्टीवर भारत - पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना देखील होणार आहे.

T20 World Cup 2024 Drop In Pitches
T20 World Cup 2024 : जर सात फलंदाज WC जिंकून देऊ शकत नाही तर... भारतीय संघनिवडीपूर्वी सिद्धूनं दिला द्रविडला मोलाचा सल्ला

टी 20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेतील सामन्यामध्ये अॅडिलेडमधून खेळपट्ट्या आणण्यात आल्या आहेत. या खेळपट्ट्यांनी अॅडिलेड ते फ्लोरिडा असा प्रवास केला आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क, टेक्सास आणि फ्लोरिडा येथे क्रिकेटचे सामने होणार आहेत. टी 20 वर्ल्डकपच्या वेळापत्रकानुसार 16 सामने हे अमेरिकेत खेळले जाणार आहेत. तर उर्वरित 39 सामने हे वेस्ट इंडीजमध्ये होतील.

अमेरिकेतील खेळपट्ट्या कोणाला देणार साथ?

अॅडिलेड ओव्हलवरील पिच क्युरेटर डॅमिन हॉग यांनी सांगितले की, 'चेंडू एकसमोर वेग आणि उसळी घेईल अशी खेळपट्टी तयार करण्याचा आमचा उद्येश आहे. या खेळपट्टीवर खेळाडूला त्यांचे शॉट्स चांगल्या प्रकारे खेळता येतील.'

T20 World Cup 2024 Drop In Pitches
T20 WC 2024 Team India : गोलंदाजांच्या सुमार कामगिरीनं वाढवलं बीसीसीआयचं टेन्शन; बुमराह सोडला तर सर्व वेगवान गोलंदाज...

बीसीसीने दिलेल्या माहितीनुसार 10 ड्रॉप इन पिचेसवर ऑक्टोबर 2023 पासूनच काम सुरू झालं होतं. या खेळपट्ट्या आधी ट्रेमध्ये प्लांट करण्यात आल्या. यासाठी चिखलासारखी माती वापरण्यात आली. अशा प्रकारची माती बेसबॉलसाठी वापरण्यात येते. एकदा खेळपट्ट्या तयार झाल्यानंतर त्यांना जानेवारी महिन्यात अॅडिलेडमधून रवाना करण्यात आलं. खेळपट्टी उबदार वातावरण फ्लोरिडापर्यंत पोहचल्या आहेत.

(Cricket Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com