Is Australia out of T20 World Cup after Zimbabwe defeat
esakal
Cricket
AUS vs ZIM : ऑस्ट्रेलियाचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात? झिम्बाब्वेच्या अविश्वसनीय विजयाने 'ब' गटाचे समीकरण बदलले...
Is Australia out of T20 World Cup after Zimbabwe defeat? ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला दिलेल्या धक्कादायक पराभवामुळे ‘ब’ गटाचे संपूर्ण समीकरण बदलले आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघावर मात करत झिम्बाब्वेने केवळ विजयच मिळवला नाही, तर सुपर ८ च्या शर्यतीत मोठा ट्विस्ट निर्माण केला आहे.
Zimbabwe shocking win impact on Australia Super 8s chances : झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या या पर्वातील पहिला धक्कादायक निकाल नोंदवला. कोलंबो येथे झालेल्या लढतीत झिम्बाब्वेने माजी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी हार मानण्यास भाग पाडले. झिम्बाब्वेचा ब गटातील हा सलग दुसरा विजय ठरला, तर ऑस्ट्रेलियाचा दोन सामन्यातील पहिला पराभव ठरला. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण, पिक्चर अभी बाकी है...
