New Zealand Knock Sri Lanka Out; Pakistan’s Semifinal Hopes Take a Hit
esakal
New Zealand victory over Sri Lanka : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले आहे. सुपर ८ च्या लढतीत त्यांनी सहयजमान श्रीलंकेवर दणदणीत विजयाची नोंद केली आणि ३ गुणांसह ग्रुप २ च्या तालिकेतील दुसरे स्थानावरील आपली जागा मजबूत केली. न्यूझीलंडचे आता ३ गुण झाले आहेत आणि पाकिस्तान १ गुणासह अजूनही स्पर्धेत आहे. श्रीलंका मात्र दोन पराभवांमुळे स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. आता पाकिस्तानचा शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध आहे आणि त्यात त्यांनी बाजी मारली तर कुठे संधी आहे. पण, त्यासाठीही एक अट आहे...