Australia qualification depends on Ireland vs Zimbabwe match
esakal
Sri Lanka qualify for Super 8s after beating Australia : आधी अविश्वसनीय झेल अन् नंतर फलंदाजीत कमाल, पथूम निसंकाने श्रीलंकेला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवून दिला. Pathum Nissanka हा या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला शतकवीर ठरला. श्रीलंकेचा सलग तिसरा विजय ठरला आणि त्यांनी आगेकूच केली. पण, ऑस्ट्रेलियावर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता बळावली आहे. ऑस्ट्रेलियाचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे आणि त्यांचे भविष्य आता आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यावर अवलंबून राहिले आहे.