Explained : बांगलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतातील सामने खेळण्यास नकारच दिला तर काय? त्यांच्या जागी कोणाला संधी मिळेल?

Bangladesh pull out scenario explained T20 World Cup : जर बांगलादेशने भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप सामन्यांमध्ये खेळण्यास नकार दिला, तर ICC समोर मोठे आव्हान उभे राहील. मात्र नियमांनुसार, कोणताही संघ स्पर्धेच्या वेळापत्रकातून माघार घेतल्यास त्याचा थेट परिणाम त्या संघावरच होतो.
What Happens if Bangladesh Stick To Their Stance?

What Happens if Bangladesh Stick To Their Stance?

esakal

Updated on

What happens if Bangladesh refuse to play T20 World Cup in India? बांगलादेशी खेळाडू मुस्ताफिजूर रहमान ( Mustafizur Rahman)याच्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCC) घेतलेल्या भूमिकेमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. बीसीसीआयने कोलकाता नाइट रायडर्सला बांगलादेशी गोलंदाजाला रिलीज करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर आता बांगलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लिटन दासच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बांगलादेश संघाने ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार दिला आहे. बांगलादेशचा हाच पवित्रा राहिल्यास, ICC कडे तीन पर्याय आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com