Zimbabwe Cricket : सर्व अपराजित संघ एकाच 'ग्रुप'मध्ये! श्रीलंकेला नमवून झिम्बाब्वेने नोंदवले '७' विक्रम; भारताविरुद्ध सामना कधी?

India vs Zimbabwe Super 8 match date and venue details: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या सुपर ८ फेरीत आता खरी रंगत चढली आहे. भारत, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज, हे चारही अपराजित संघ एकाच गटात आल्यामुळे स्पर्धेचे चित्रच पालटले आहे. हा गट आता ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
India vs Zimbabwe Super 8 match date and venue details

India vs Zimbabwe Super 8 match date and venue details

esakal

Updated on

T20 World Cup Zimbabwe 7 big records after beating Sri Lanka : झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अनपेक्षित निकालांची मालिकाच लावली आहे. माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर झिम्बाब्वेने गट साखळीतील शेवटच्या सामन्यात यजमान श्रीलंकेला पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. श्रीलंकेचे १७९ धावांचे लक्ष्य झिम्बाब्वेने ६ विकेट्स राखून सहज पार केले आणि ब गटात ते सर्वाधिक ७ गुणांसह सुपर ८ मध्ये गेले आहेत. आता Super 8 मधील ग्रुप १ मध्ये सर्वच टेबल टॉपर झाले आहेत. यात भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे प्रत्येकी ८ गुणांसह आपापल्या गटात अव्वल राहिले आहेत. त्यामुळे या ग्रुपच्या सामन्यांची उत्सुकता वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com