IND VS ENG SEMI-FINAL: LUNAR ECLIPSE FORCES INDIA TO CHANGE TRAINING SCHEDULE
esakal
India changed training schedule due to lunar eclipse : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी सराव सत्राच्या वेळेत अचानक बदल केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. भारत-इंग्लंड यांच्यात ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ आज सरावाला मैदानावर उतरणार होते. इंग्लंडने त्यांचा सराव नियोजित २ ते ५ वेळेत केला. भारतीय संघ सायंकाळी ६ वाजता सरावाला सुरूवात करणे अपेक्षित होते. मीडिया मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत वानखेडेवर सराव करणार होता.