T20 World Cup : न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामना पाकिस्तानसाठी का आहे महत्त्वाचा? आजच शेजाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार...

Pakistan qualification scenario in T20 World Cup Super 8: वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवास आता इतर संघांच्या निकालांवर अवलंबून झाला आहे. विशेषतः न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गुणतालिकेतली स्थिती, नेट रनरेट आणि उर्वरित सामने यामुळे समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
Pakistan’s semifinal qualification scenario in the T20 World Cup explained

Pakistan’s semifinal qualification scenario in the T20 World Cup explained

esakal

Updated on

How NZ vs ENG result affects Pakistan points table? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी सुपर ८च्या आपापल्या गटातून उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला आहे. आज ग्रुप २ मध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. पण, या दोन्ही संघांव्यतिरिक्त या सामन्याकडे पाकिस्तान संघाचेही लक्ष लागले आहे. इंग्लंडने आधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला असला तरी या सामन्यातील निकाल हा पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवणारा ठरू शकतो. त्यामुळेच सलमान अली आघाचा संघ आज हा सामना पाहायला बसल्यास आश्चर्य वाटायला नको.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com