AUS vs ZIM : झिम्बाब्वेचा खळबळजनक विजय! ऑस्ट्रेलियाला १९ वर्षानंतर नमवले; सुपर कॅच, भन्नाट गोलंदाजी अन् सुरेख फलंदाजी...

T20 World Cup Australia vs Zimbabwe Marathi News: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर १९ वर्षांनंतर ऐतिहासिक विजय नोंदवत मोठा धक्का दिला. १७० धावांचे आव्हान देताना झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी संयमी पण प्रभावी खेळ केला. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली.
Zimbabwe register a historic win over Australia after 19 years

Zimbabwe register a historic win over Australia after 19 years

esakal

Updated on

T20 World Cup Australia vs Zimbabwe Marathi Live Update: झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. दमदार फलंदाजी, उल्लेखनीय गोलंदाजी आणि शिस्तबद्ध क्षेत्ररक्षण... या जोरावर झिम्बाब्वेने या वर्ल्ड कपमधील धक्कादायक निकाल लावला़. ऑस्ट्रेलियाचा मॅट रेनशॉ व ग्लेन मॅक्सवेल ही जोडी मैदानावर उभी राहिली. १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने २९ धावांवर ४ फलंदाज गमावले होते. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी ऑसींची धावगती संथ ठेवली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर दडपण वाढत गेले. १८व्या षटकात Munyonga ने घेतलेला अविश्वसनीय झेल सामन्याला कलाटणी देणारा ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com