USA defeat Namibia in T20 World Cup, putting Pakistan in danger of elimination
esakal
T20 World Cup USA Beat Namibia Marathi Cricket News: कर्णधार मोनांक पटेल आणि संजय कृष्णामुर्ती यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अमेरिकेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नामिबियासमोर मोठे आव्हान उभे केले. त्यानंतर अमेरिकेच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करताना संघाला विजय मिळवून दिला आणि त्याचं टेंशन पाकिस्तान संघाला आले आहे. अमेरिकेच्या या विजयाने अ गटातील समीकरण पूर्णपणे बदलले आहे आणि पाकिस्तानवर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढावली जाईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.