Shivam Dube’s injury has raised concerns ahead of India’s crucial T20I series against Australia
esakal
India vs Australia T20 series 2025 squad injury news : भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर २९ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया वन डे मालिका खास असणार आहे, कारण रोहित शर्मा व विराट कोहली ७ महिन्यानंतर निळ्या जर्सीत दिसणार आहेत. पण, यावेळी त्यांना शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे. यानंतर होणारी ट्वेंटी-२० मालिका ही २०२६ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. पण, या मालिकेला १४ दिवस असताना भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे ( Shivam Dube Injured) याला दुखापत झाल्याचे वृ्त्त आहे.