भारताला जेतेपदाच्या हॅट् ट्रिकची संधी! T20 World Cup 2028 साठी १२ संघ पात्र, कसा असेल उर्वरित ८ जागांसाठीचा मार्ग?

Road to ICC Men’s T20 World Cup 2028 qualification explained: भारतीय संघाने २०२६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता पुढील स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. २०२८ मध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या संयुक्त विद्यामाने होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा प्रवास अधिकृतपणे सुरू झाला असून आतापर्यंत १२ संघांनी पात्रता मिळवली आहे.
After India’s T20 World Cup 2026 triumph, the road to the 2028 edition has officially begun

After India’s T20 World Cup 2026 triumph, the road to the 2028 edition has officially begun

esakal

Updated on

Which teams have qualified for T20 World Cup 2028: भारतीय संघाने ८ मार्च २०२६ रोजी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आणि त्याच दिवसापासून २०२८ च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची शर्यतही सुरू झाली. दोन वर्षानंतर ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या १२ संघांची नावे समोर आली आहेत. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे यजमान म्हणून आधीच पात्र ठरले आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा २०२६ मधील अव्वल सात संघही पुढील वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले आहेत. यातून यजमान न्यूझीलंडला वगळल्याने पुढील संघाला संधी मिळाली आहे. उर्वरीत तीन संघ हे आयसीसी क्रमवारीच्या जोरावर पात्र ठरले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com