
भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत करत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले.
भारताच्या या विजयानंतर खेळाडूंनी मोठा जल्लोष केला. मैदानात डान्स करून एकमेकांची गळाभेट घेत या विजयाचा आनंद साजरा झाला. यावेळी भारतीय खेळाडूंचे कुटुंबिय देखील मैदानात हजर होते. या जल्लोषाचे अनेक व्हिडिओही समोर आले.