

India vs Sri Lanka Cricket XI
Sakal
IND vs SLC XI Warm up: भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (९ ऑगस्ट) श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध झालेला तीन दिवसीय सराव सामना ६ विकेट्सने जिंकला आहे. भारताचा श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ (WTC 2025-27) स्पर्धेचाही भाग असल्याने महत्त्वाची आहे. त्यामुळे या मालिकेसाठी सराव म्हणून भारताने कोलंबोमध्ये श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्ध तीन दिवसांचा सराव सामना खेळला.