Gautam Gambhir: गौतम गंभीरला हवी त्याची माणसं? BCCI च्या स्टेटमेंटमधून उलगडलं रहस्य

Team India Coach: फक्त राहुल द्रविडच नाही, तर सपोर्ट स्टाफमधील तीन महत्त्वाच्या सदस्यांचाही कार्यकाळ टी२० वर्ल्ड कप २०२४ नंतर संपला आहे. त्यामुळे त्यांच्या जागा लवकरच भरण्यात येईल.
Gautam Gambhir | Jay Shah
Gautam Gambhir | Jay ShahSakal
Updated on

Gautam Gambhir Team India Coach: बीसीसीआयने मंगळवारी (९ जुलै) भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची नियुक्ती केली आहे. याबद्दल सोशल मिडियावर पोस्ट करत बीसीसीआयने माहिती दिली.

खरंतर १३ मे रोजीच बीसीसीआयने या पदासाठी उमेदवारी अर्ज मागवले होते. त्यावेळीच हे निश्चित झाले होते की टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा राहुल द्रविडची भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून अखेरची स्पर्धा ठरणार आहे.

त्यामुळे द्रविडचा वारसदार कोण असणार याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती. अखेर गंभीरच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. गंभीरचं नाव तसं याआधीपासूनच चर्चेत होतं. गंभीर आता डिसेंबर २०२७ पर्यंत भारतीय संघाचा प्रशिक्षक असणार आहे.

Gautam Gambhir | Jay Shah
Gautam Gambhir Statement: "मी पुन्हा आलो पण, सर्व शक्तीनिशी..."; हेड कोच होताच गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य!

दरम्यान, मिडिया रिपोर्ट्सनुसार गंभीरने प्रशिक्षक होण्यापूर्वी बीसीसीआयसमोर संघ निवडीचे सर्वाधिकार हवेत, अशी अट ठेवली होती. त्यामुळे गंभीर सपोर्ट स्टाफमधील त्याच्या मदतनीसांची निवड स्वत: करणार असल्याचे समजले होते.

त्यातच आता बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात आता द्रविडबरोबरच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांचेही त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी आभार मानले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Gautam Gambhir | Jay Shah
Gautam Gambhir Coach: गौतम गंभीरचा कार्यकाळ किती असणार अन् सूत्र केव्हा हाती घेणार? जाणून घ्या अपडेट्स

यातून आता हे स्पष्ट झाले आहे की द्रविडबरोबर काम करणाऱ्या या सपोर्ट स्टाफमधील महत्त्वाच्या सदस्यांचाही कार्यकाळ टी२० वर्ल्ड कप २०२४ नंतर संपला आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता गंभीरबरोबर नवे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षकही मिळणार आहेत.

दरम्यान,मीडिया रिपोर्ट्सनुसार गंभीरला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायर, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून विनय कुमार हवे आहेत. तसेच क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून जॉन्टी ऱ्होड्स यांचे नाव चर्चेत आहे.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.