Team India | England vs India 2nd TestSakal
Cricket
WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर
India in WTC 2025-27 Points Table: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकला. त्यामुळे WTC 2025-27 स्पर्धेत भारताच्या गुणांचे खाते उघडले आहे. भारतीय संघ कोणत्या क्रमांकावर आहे, जाणून घ्या.
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (६ जुलै) इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत इतिहास रचला. भारताने ऍजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात ३३६ धावांनी विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.
या विजयामुळे भारताला मोठा फायदाही झाला आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेचा (WTC 2025-27) भाग आहे. त्यामुळे भारताने या विजयासह गुणांचे खाते उघडले आहे.