Team India schedule 2026 Asian Games Australia Test series
esakal
Team India upcoming schedule after Afghanistan series: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकली आणि आता हा संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानला रवाना होणार आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आहे. एकामागून एक मालिका भारतीय संघ खेळणार आहे आणि क्रिकेट चाहत्यांसाठी ही मेजवानी असेल.
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेट सामने २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान होतील आणि यात भारतीय संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. भारताला अंतिम फेरीत पाकिस्तानशी दोन हात करण्याची संधी मिळू शकते. याच कालावधीत वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर तीन वन डे व पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे.