
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी मोठा निर्णय जाहीर केला आहे. बीसीसीआयने मायदेशात २०२५ वर्षात होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. अनेक सामन्यांची ठिकाणंही बदलण्यात आली आहेत. यात आंतरराष्ट्रीय मालिका आणि दक्षिण आफ्रिका अ संघाच्या दौऱ्याचाही समावेश आहे.
भारतीय संघाला मायदेशात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, वनडे आणि टी२० मालिका खेळायच्या आहेत. यात २ ऑक्टोबर २०२५ पासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना आता दिल्लीमध्ये अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. तो आधी कोलकातामध्ये होणार होता.