Team India : कसोटी मालिका संपली! आता टीम इंडिया थेट इतक्या महिन्यांनंतर 'या' संघाविरुद्ध दिसणार ॲक्शनमध्ये

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाच्या विजयाने संपली आहे आता....
Team India news in marathi
Team India news in marathisakal

Team India Schedule T20 World Cup and Next Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाच्या विजयाने संपली आहे. भारताने या मालिकेत इंग्लिश संघाचा 4-1 असा पराभव केला. पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लिश संघाला एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला.

आता पुढील काही महिने टीम इंडियासाठी कोणताही सामना किंवा मालिका खेळणार नाही. भारतीय संघाचे सर्व खेळाडू तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा मैदानावर ॲक्शनमध्ये दिसतील. याआधी सर्व खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांकडून खेळताना दिसणार आहेत.

Team India news in marathi
ICC Rankings : रोहित ब्रिगेडचा बोलबाला! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पुन्हा एकदा टीम इंडिया नंबर वन

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली गेलेली कसोटी मालिका खूपच मज्जा आली. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने टीम इंडियाविरुद्ध दमदार विजयाने सुरुवात केली. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया संघाने दमदार पुनरागमन करत सलग चार सामने जिंकून मालिका खिशात घातली.

हैदराबाद कसोटी गमावल्यानंतर भारताने विशाखापट्टणम, राजकोट आणि रांची येथे विजय नोंदवून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली. टीम इंडियाने धरमशाला येथील शेवटची कसोटी जिंकून मालिका 4-1 अशी जिंकली.

Team India news in marathi
ICC Rankings : रोहित ब्रिगेडचा बोलबाला! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पुन्हा एकदा टीम इंडिया नंबर वन

भारताचा पुढील आंतरराष्ट्रीय सामना कधी?

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर टीम इंडिया आता थेट वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि यूएसए यांच्या संयुक्त विद्यमाने जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. भारताला 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. धरमशाला कसोटीनंतर भारत थेट जूनमध्येच खेळणार आहे.

टीम इंडियाचे टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक - (T20 World Cup 2024 Schedule)

  • 5 जून - टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड

  • 9 जून - टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान

  • 12 जून - टीम इंडिया विरुद्ध यूएएसए

  • 15 जून - टीम इंडिया विरुद्ध कॅनेडा

Team India news in marathi
WPL 2024 : पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ! मुंबई इंडियन्सने बुक केले प्लेऑफचे तिकीट; हा संघ स्पर्धेतून बाहेर

भारताची पुढील मालिका कधी होणार?

भारतीय संघ आता कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत आयसीसी टी-20 वर्ल्ड कपनंतरच खेळणार आहे. टीम इंडियाला जुलैमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारताला हे सर्व सामने 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान खेळायचे आहेत.

भारतीय संघ 6 आणि 7 जुलै रोजी झिम्बाब्वे दौऱ्यावर पहिला आणि दुसरा टी-20 सामना खेळणार आहे. तिसरा टी-20 सामना 10 तारखेला तर चौथा टी-20 सामना 13 जुलै रोजी खेळला जाईल. या मालिकेतील शेवटचा सामना 14 जुलै रोजी होणार आहे. हे सर्व सामने हरारे येथे खेळवण्याचे नियोजन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com