ICC Rankings : रोहित ब्रिगेडचा बोलबाला! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पुन्हा एकदा टीम इंडिया नंबर वन

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 4-1 अशा विजयाचा फायदा झाला आहे. या विजयासह रोहित शर्माचा संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
ICC Team Ranking 2024 Team India news in marathi
ICC Team Ranking 2024 Team India news in marathisakal

ICC Team Ranking 2024 Team India : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 4-1 अशा विजयाचा फायदा झाला आहे. या विजयासह रोहित शर्माचा संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तो आधीच टी-20 आणि वनडेमध्ये अव्वल होता. अशाप्रकारे भारत एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनला आहे.

ICC Team Ranking 2024 Team India news in marathi
WPL 2024 : दिल्लीत चालू मॅचमध्ये घडली मोठी घटना! बराच वेळ थांबवावा लागला सामना; नेमकं घडलं तरी काय?

यापूर्वी डिसेंबरमध्येही टीम इंडियाने अशी कामगिरी केली होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने पहिला कसोटी सामना गमावला. आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया नंबर-1 संघ बनला होता. आता विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धरमशाला कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा कसोटीतील नंबर-1 टीम बनला आहे. भारताने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे.

ICC Team Ranking 2024 Team India news in marathi
Ranji Trophy : मुंबईला खुणावतेय रणजी विजेतेपद; आजपासून सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यात विदर्भाचे आव्हान

ICC च्या ताज्या अपडेटमध्ये टीम इंडियाचे 4636 पॉइंट्स आणि 122 रेटिंग आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे रेटिंग 117 आहे. तर इंग्लंड 111 रेटिंगसह तिसऱ्या आणि न्यूझीलंड 101 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाने न्यूझीलंडविरुद्धची दुसरी कसोटी जिंकली तरी भारताला पहिल्या क्रमांकावरून खाली येणार नाही.

ICC Team Ranking 2024 Team India news in marathi
WPL 2024 : पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ! मुंबई इंडियन्सने बुक केले प्लेऑफचे तिकीट; हा संघ स्पर्धेतून बाहेर

कसोटीत पहिल्या क्रमांकावर राहिल्याने भारत आता तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रमवारीत शिखरावर पोहोचला आहे. एकदिवसीय क्रमवारीत त्यांचे 121 रेटिंग गुण आहेत, ऑस्ट्रेलिया 118 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे 266 रेटिंग गुण आहेत, तर इंग्लंड (256) दुसऱ्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com