IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; ICC Championship साठी खास तयारी

India tour of Australia : भारताचा पुरुष संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी गेला असताना आता महिला संघही पुढील महिन्यात ऑसी दौऱ्यावर जाणार आहे.
IND vs AUS
IND vs AUS esakal
Updated on

India Women Cricket Team Schedule: भारतीय महिला संघाने नुकताच न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला. आता भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यासाठी बीसीसीआयने मंगळवारी संघाची घोषणा केली आहे. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठीच्या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. या मालिकेकेतील पहिले दोन सामने ब्रिस्बेन येथे होणार आहे आणि तिसरा सामना पर्थ येथे होईल. ही मालिका आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने ती जिंकणे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com