
आयपीएल २०२५ स्पर्धा संपल्यानंतर आता उत्सुकता आहे ती इंग्लंड दौऱ्याची. या दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ ६ जून रोजी इंग्लंडला पोहचला आहे. त्यानंतर लगेचच भारतीय संघाच्या सरावाला सुरुवात झाली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की भारतीय क्रिकेट संघ लंडनला पोहचल्यानंतर सरावासाठी लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर पोहोचला आहे.