INDIA’S QUALIFICATIONS SCENARIO FOR 2027 WTC FINAL
esakal
How India can still qualify for the WTC Final? भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत यजमान भारताला २-० असा दारूण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे WTC गुणतालिकेत भारतीय संघाची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सलग दोनवेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या भारतीय संघाला WTC 2025-27 या पर्वात अंतिम फेरी गाठणे अवघड झाले आहे. आता भारताची पुढील कसोटी मालिका कधी आहे आणि WTC Final साठी काय समीकरण असेल हे जाणून घेऊयात...