

Team India Schedule
Sakal
Team India’s Full Upcoming Fixtures Schedule for 2026: आयपीएलनंतर भारताच्या संघाने आयर्लंड आणि इंग्लंड दौरा केला होता. मात्र या दोन्ही दौऱ्यात भारतीय टी२० संघाला व्हाईटवॉश स्वीकारले, तसेच इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत भारताला २-१ ने पराभव स्वीकारावा लागला होता. पण त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. भारताच्या टी२० संघाने झिम्बाब्वेला ३-० अशा फरकाने व्हाईटवॉश दिला.
खरंतर दोन महिन्यांपूर्वी भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपदावरून सूर्यकुमार यादवला हटवून श्रेयस अय्यरकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण त्याच्या नेतृत्वाची सुरुवात आयर्लंड - इंग्लंड दौऱ्यातून फारशी चांगली झाली नाही. तरी झिम्बाब्वेमधील यशाने त्याला समाधान मिळाले असेल. यानंतर आता भारतीय संघ प्रचंड व्यस्त राहणार आहे.