IND vs ZIM: "हा पोरगा कोणालाच संघात परत येऊ देणार नाही!", वैभव सूर्यवंशीच्या खेळीनं भारतीय दिग्गजाचा सॅमसनला इशारा?

Irfan Pathan’s Bold Claim on Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने भारताला झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला. त्याच्या कामगिरीनंतर भारताचा दिग्गज खेळाडूने मोठे विधान केले आहे.
Sanju Samson - Vaibhav Sooryavanshi

Sanju Samson - Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

Zimbabwe vs India T20I Marathi News: भारतीय टी२० संघाने नुकतीच झिम्बाब्वेविरुद्धची तीन सामन्यांची टी२० मालिका ३-० अशा फरकाने जिंकली. या मालिका विजयात १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा (Vaibhav Sooryavanshi) मोठा वाटा होता. त्याने या मालिकेत दोन अर्धशतके करताना तीन सामन्यात ५० च्या सरासरीने १५१ धावा केल्या.

तिसऱ्या सामन्यात त्याने ८१ धावांनी मोठी खेळीही केली होती. त्यामुळे त्याला तिसऱ्या सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला, तर मालिका विजयानंतर मालिकावीर पुरस्कारही मिळाला. मात्र त्याच्या या शानदार कामगिरीमुळे इतर सलामीवीरांना, ज्यात संजू सॅमसनचाही (Sanju Samson) समावेश आहे, त्यांना पुनरागमन करणे कठीण झाले, असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने (Irfan Pathan) व्यक्त केले आहे.

Sanju Samson - Vaibhav Sooryavanshi
IND vs ZIM, T20I: 'युवा खेळांडूंच्या ऊर्जेने...' श्रेयस अय्यरनं सांगितलं झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकाविजयाचं कारण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com