
बीसीसीआय उद्या एकाच वेळी दोन संघ जाहीर करणार आहे.
आशिया चषकासाठीचा पुरुषांचा संघ निवड समिती निश्चित करणार आहे.
सूर्यकुमार यादव फिटनेस टेस्ट पास झाल्याने त्याचे नेतृत्व निश्चित झाले आहे.
Prepares to Reveal Team India Squad for WWC 2025 : भारतीय क्रिकेट चाहते आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघ निवडीकडे डोळे लावून बसले आहेत. ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी उद्या म्हणजेच गुरुवारी हा संघ जाहीर होण्याची चर्चा आहे. पण, आताच हाती आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय उद्या एक नव्हे तर दोन संघ जाहीर करणार आहेत आणि त्यापैकी एका संघाची घोषणा करताना पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.