आशिया चषक २०२५ साठी टीम इंडियाच्या निवडीवर मोठी चर्चा सुरू आहे.
वैभव पुरेसा प्रगल्भ असून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायला तयार आहे.
IPL 2025 आणि U-19 सामन्यांमध्ये वैभवने दमदार कामगिरी करून आपली छाप सोडली आहे.
Vaibhav Suryavanshi Asia Cup 2025 selection debate: आशिया चषक स्पर्धेच्या संघावरून बरीच चर्चा सुरू आहे... शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, शिवम दुबे आदी खेळाडूंना ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये होणाऱ्या आशिया चषकात खेळवायचे का? यावर चर्चेचा किस पाडला जातोय. अशात भारताचे माजी खेळाडू आपापली प्लेइंग इलेव्हन जाहीर करून मोकळे झाले आहेत.. काही अजूनही निवड समितीला अमक्याला घ्या तमक्याला घेऊ नका, असे सल्ले देत आहेत. अशात आणखी एक सल्ला आला आहे की, १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला आशिया चषक स्पर्धेसाठी निवडा.