IND vs SL Tour : गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील पहिल्या दौऱ्याचं वेळापत्रक ठरलं; टीम इंडिया झाली सज्ज

Team India will arrive in Sri Lanka on July 22 - बीसीसीआयने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी गौतम गंभीरकडे सोपवली आहे
Team India will tour Sri Lanka
Team India will tour Sri Lankasakal
Updated on

Team India tour Sri Lanka - भारताचा युवा संघ झिम्बाब्वे दौरा गाजवतोय आणि सध्या त्यांनी पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या विजेतेपदानंतर लगेचच आलेल्या या दौऱ्यासाठी संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्याजागी माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याची निवड केली गेली आहे.

गौतम गंभीरने आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे मेंटॉरपद भूषविताना फ्रँचायझीला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याआधी त्याने लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर म्हणून दोन वर्ष काम केले आणि LSG ला यशही मिळवून दिले. आता गंभीर राष्ट्रीय संघासोबत काम करणार आहे आणि तो भविष्याचा विचार करून संघबांधणी करणार आहे. रोहित, विराट व जडेजा यांच्या रिक्त जागा भरण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असेल.

Team India will tour Sri Lanka
Hardik Pandya : घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान हार्दिक दिसला 'या' सुंदरीसोबत; फोटो व्हायरल झाल्यामुळे उडाली खळबळ

गौतमचा टीम इंडियासोबतचा कार्यकाळ २०२७ पर्यंत असणार आहे आणि या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ( WTC), चॅम्पियन्स ट्रॉफी, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि वन डे वर्ल्ड कप अशी आव्हानं आहेत. अशात गौतम गंभीरच्या या नव्या भूमिकेच्या प्रवासाला जुलै महिन्यापासूनच सुरुवात होतेय. त्याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा पहिला दौरा हा श्रीलंकेचा असणार आहे आणि तेथे ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे, तर वन डे संघाचे लोकेश राहुलकडे जाण्याची शक्यता आहे. रोहित व विराट विश्रांती घेऊ शकतात. भारतीय संघ २२ जुलैला रवाना होणार आहे.

Team India will tour Sri Lanka
Rohit Sharma : गुरु द्रविडचा पठ्ठ्या रोहित करणार होता 5 कोटींचे बलिदान पण... वाटणीवेळी काय घडलं नेमकं?

India vs Sri Lanka Schedule

ट्वेंटी-२० मालिके वेळापत्रक - २६ जुलै, २७ जुलै व २९ जुलै ( सर्व सामने पल्लेकल येथे)

वन डे मालिकेचे वेळापत्रक - १ ऑगस्ट, ४ ऑगस्ट व ७ ऑगस्ट ( सर्व सामने कोलंबो येथे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.