

World Cup 2027
esakal
Team India World Cup 2027: वनडे वर्ल्ड कप २०२७ ला पुढील वर्षी ४ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी तयारी सुरू केली असून भारतीय संघही आतापासूनच प्लॅनिंग करत आहे. २०११ नंतर भारताला वनडे वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. २०२३ मध्ये भारताने अंतिम फेरी गाठली होती, मात्र ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात विजय मिळवत भारतीय चाहत्यांचं स्वप्न अधुरं ठेवलं.
आता २०२७ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकायची आहे. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीतील हा अखेरचा मोठा वर्ल्ड कप ठरू शकतो. त्यामुळे टीम इंडियासाठी ही स्पर्धा आणखी खास असणार आहे.