IND vs AUS ODI Series: Rohit Returns, Yashasvi Likely to Miss Out Again
esakal
Team India’s Predicted XI vs Australia: भारतीय संघ पुढच्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. १९ ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होत आहे आणि रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यामुळे या मालिकेला खूप मागणी आली आहे. पण, या मालिकेसाठी वन डे संघाचे कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. अशात रोहित व विराटची ही शेवटची वन डे मालिका असू शकते असा अंदाज लावला जात आहे.