WTC 2027 points table after New Zealand vs West Indies Test
esakal
WTC 2027 points table after New Zealand vs West Indies 3rd Test : भारतीय संघाचे जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५-२७ च्या फायनलमध्ये पोहोचणे आता आणखी अवघड झाले आहे. न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ३२३ धावांनी दणदणीत विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घातली आहे. न्यूझीलंडचा हा विजय शुभमन गिलच्या ( Shubman Gill) भारतीय संघाला सर्वाधिक धक्का देणारा आहे. घरच्या मैदानावर दोन मालिका गमावल्याने भारतीय संघ आधीच अडचणीत होता आणि त्यात न्यूझीलंडने WTC Standings मधील दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत करून भारताला जवळजवळ फायनलच्या शर्यतीतून बाहेर फेकले आहे.