आशिया चषक 2025 साठी भारतीय संघ लवकरच जाहीर होणार असून अनेक खेळाडू फिटनेस टेस्ट देत आहेत.
शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांचा वर्कलोड मॅनेजमेंटमुळे निवडीवर प्रश्नचिन्ह आहे.
रिषभ पंत दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर राहण्याची शक्यता आहे.
Asia Cup 2025 Squad : आशिया चषक स्पर्धेसाठीचा भारतीय संघ येत्या काही दिवसांत जाहीर केला जाणार आहे. सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या हे फिटनेस टेस्टसाठी बंगळुरूत दाखल झाले आहेत आणि त्यांच्या वैद्यकीय अहवालानंतर पुढचा संघ ठरणार आहे. शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल यांना ट्वेंटी-२० संघात खेळवायचे का, यावरही चर्चा सुरू आहे. कारण, आशिया चषकानंतर लगेच चार दिवसांनी कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे वर्कलोडचा मुद्दा समोर येत आहे. अशात यष्टीरक्षक-फलंदाजांच्या जागेसाठीही जोरदार शर्यत पाहायला मिळत आहे आणि चार दावेदार हक्क सांगत आहेत.