

Krishna Satpute
Sakal
भारत हा क्रिकेटवेडा देश तर आहेच, पण आता याच देशात टेनिस क्रिकेटही नवी ओळख मिळवत आहे. टेनिस क्रिकेटलाही ग्लॅमर मिळत आहे, यासाठी अनेकांनी योगदान दिलं आहे. यातीलच एक नाव म्हणजे कृष्णा सातपुते (Krishna Satpute).
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगपासून (ISPL) ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करण्यापर्यंत त्याने प्रवास केला. दुबई ते लंडनपर्यंत त्याच्या नावाची चर्चा असते, तो टेनिस क्रिकेटमधील रनमशीन असून त्याच्या हेलिकॉप्टर शॉट तर अत्यंत प्रसिद्ध आहे.
पण त्याचा हा प्रवास कधीच सोपा नव्हता आई-वडिलांचं छत्र हरवल्यानंतर कुटुंबाला सांभाळत टेनिस क्रिकेटमध्ये त्यानं नाव कमावलं. त्याचा हा गल्लीपासून ग्लोरीपर्यंतचा प्रवास कसा होता, हे त्यानेच सकाळला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.