
लहानपणी कबड्डी फारशी न आवडणारा, पण शाळेतल्या सरांच्या आग्रहखातर कबड्डीशी नातं जोडलेला नांदेडचा विशाल टटे आज नाव उंचावण्यासाठी सज्ज आहे. मोठा संघर्ष करत तो प्रो कबड्डीपर्यंत पोहोचला असून भारतासाठी मेडल मिळवायचं असं स्वप्न उराशी बाळगून आहे.
तो आत्ता प्रो कबड्डीमध्ये हरियाना स्टीलर्सचं प्रतिनिधित्व करतोय, याच संघाला गेल्या हंगामात विजेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. त्याच्याशी ई-सकाळने साधलेला संवाद...