GREAT GABBA PIG INCIDENT
The Great Gabba Pig Incident 1983 explained: क्रिकेटच्या इतिहासातील पाने चाळल्यास आपल्याला बरेच भन्नाट किस्से वाचायला मिळतील... काळानुसार क्रिकेट बदलले, परंतु हे किस्से आजही लोकांना भुतकाळात रमवतात.. असाच एक किस्सा आपण जाणून घेणार आहोत. काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर एक पोस्टर व्हायरल झाले होते. बॉथम व एडी या दोन खेळाडूची नावं पाठीवर लिहिलेले डुक्कर क्रिकेटच्या मैदानावर पळतोय आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांची धावपळ दाखवणारे हे पोस्टर होते. क्रिकेटच्या मैदानावर लाईव्ह सामन्यात असे काही घडू शकते, याची कल्पनाही कुणी केली नसावी. पण, हे घडले आणि या घटनेला The Great Gabba Pig Incident असे म्हटले जाते.