Mumbai Indians playoff chances and required changes
esakal
Mumbai Indians turnaround plan IPL 2026 captaincy change analysis: मुंबई इंडियन्सला गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सकडून दारूण पराभव पत्करावा लागला आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये MI ने आतापर्यंत ७ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि ते सध्या गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहेत. मुंबईच्या या परिस्थितीवर कर्णधार हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) जबाबदार धरले जात आहे. त्याचे डावपेच चुकत आहेत, रणनीती आखण्यात तो कमी पडतोय... त्यात रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर बसला आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सला Playoff चे गणित गाठायचे असल्यात तातडीने पाऊलं उचलावी लागणार आहेत.