

Vijay Shankar | Afghanistan Premier League
Sakal
आगामी काळात अफगाणिस्तान प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा खेळवली जाणार आहे. या हंगामासाठी खेळाडूंचे ड्राफ्ट समोर आले असून यात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच २९ पाकिस्तानी खेळाडूंचाही समावेश आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर यानेही नाव नोंदवलं आहे, पण त्याने ब्रिटिश नागरीक म्हणून त्याचे नाव नोंदवले आहे. त्याला ड्राफ्टमध्ये प्लॅटिनम कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याने यापूर्वी आयपीएल लिलावासाठीही इंग्लंडकडून नाव नोंदवलं आहे. पण आता त्याला खरंतर कोणती फ्रँचायझी संघात घेणार की नाही, हे पाहावं लागणार आहे.