
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच मुंबई इंडियन्सने रविवारी (१३ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सला १२ धावांनी पराभवाचा धक्का दिला. मुंबई इंडियन्सचा हंगामातील दुसराच विजय ठरला, तर दिल्लीचा मात्र पहिलाच पराभव ठरला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले होते.