Ayush Mhatre to join CSK as replacement for Ruturaj Gaikwad
चेन्नई सुपर किंग्सचा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील फॉर्म काही चांगला चाललेला नाही. आयपीएल इतिहासात ते प्रथमच पाच सामने हरले, त्यात घरच्या मैदानावर पराभवाची हॅटट्रिकही त्यांनी पहिल्यांदाच मारली. आता प्ले ऑफच्या गणिताची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांना उर्वरित ८ पैकी किमान ७ सामने जिंकावे लागतील, त्यानंतरही नेट रन रेट महत्त्वाचा असेलच. ऋतुराज गायकवाडने दुखापतीमुळे लीगमधून माघार घेतल्याने आता MS Dhoni कॅप्टनच्या रूपात दिसतोय.