Tilak Varma: श्रीलंका, तेलंगणा अन् थेट मुंबई! मित्राच्या शपथविधीसाठी तिलक वर्माची खास उपस्थिती,'मी त्याला लहानपणापासून...

Tilak Varma Attends Vikram Kakade's Oath Ceremony: तिलक वर्मा आपल्या जिवलग मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काकडे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी खास मुंबईत आला. यावेळी त्याने "तो माझा मित्र नाही, भाऊ आहे" अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
Tilak Varma Attends Vikram Kakade's Oath Ceremony

Tilak Varma Attends Vikram Kakade's Oath Ceremony

esakal

Updated on

Tilak Varma Attends Vikram Kakade's Oath Ceremony: सध्या भारतीय संघाचा टी-२० उपकर्णधार तिलक वर्मा मैदानाबाहेरच्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. १७ पैकी ६ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

या नव्या आमदारांचा शपथविधी सोहळा आज विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे, या सोहळ्याला टीम इंडियाचा स्टार फलंदाज तिलक वर्माही(Tilak varma) उपस्थित राहिला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com