Tilak Varma Century: तिलक वर्माचा नेपाळवर तुफानी हल्ला! ११३ चेंडूंत ठोकलं बाहुबली शतक, चौकार-षटकारांच्या आतषबाजीने गोलंदाजांची दाणादाण

Tilak Varma Smashes a Brilliant Century Against Nepal: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ मध्ये तिलक वर्माने नेपाळविरुद्ध ११३ चेंडूंत १०७ धावांची शानदार खेळी केली. कुमार कुशाग्रानेही ११७ धावा करत शतक झळकावले. दोघांच्या २०६ धावांच्या भागीदारीमुळे भारत अ संघाने ५० षटकांत ३३२ धावांचा डोंगर उभारला.
Tilak Varma Century

Tilak Varma Century

esakal

Updated on: 

Tilak Varma Smashes a Brilliant Century Against Nepal: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेत गुरुवारी भारत अ आणि नेपाळ यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली असताना कर्णधार तिलक वर्माने मात्र जबाबदारीने फलंदाजी करत संघाचा डाव सावरला.

तिलकने शतकी खेळी करत भारताला ३३२ धावांपर्यंत पोहोचवले. एकवेळ भारतीय संघ २०० धावांचा टप्पा गाठेल की नाही, अशी परिस्थिती होती.

Loading content, please wait...