Updates : तिलक वर्माची न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांतून माघार; T20 World Cup मध्ये नाही खेळणार? वॉशिंग्टन सुंदरही बाहेर..

Tilak Varma injury update vs New Zealand T20 series: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेदरम्यान मोठा अपडेट मिळाला आहे. युवा फलंदाज तिलक वर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांतून माघार घेतली आहे. त्यामुळे तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप 2026 खेळणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला होता.
Tilak Varma injury update vs New Zealand T20 series

Tilak Varma injury update vs New Zealand T20 series

esakal

Updated on

Washington Sundar fitness update Team India: भारतीय संघाची घोडदौड पाहता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आपलाच आहे, असे वाटू लागले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बिनधास्त खेळतेय.. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२०त भारताने १५६ धावांचे लक्ष्य अवघ्या १० षटकांत पार केले. संजू सॅमसनचा फॉर्म वगळल्यास टीम इंडिया सर्व आघाड्यांवर वर्चस्व गाजवतेय. त्यामुळे आता हाच संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये कायम राहिला, तरी चालेल असे अनेकांना वाटतेय. पण, यात तिलक वर्माची ( Tilak Varma) एन्ट्री झाली तर आणखीच मजा येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com