IND A vs AFG A, ODI: भारतीय अ संघाचा उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा! १०१ धावांनी विजयासह ठोकली फायनलसाठी दावेदारी, समीकरण घ्या जाणून

India A beat Afghanistan A: भारतीय अ संघाने तिरंगी वनडे मालिकेत बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध १०१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यामुळे आता अंतिम सामन्यासाठी भारताने दावेदारी ठोकली आहे.
India A Team

India A Team

Sakal

Updated on

भारतीय अ संघाने बुधवारी (१७ जून) अफगाणिस्तान अ संघाविरुद्ध झालेल्या तिरंगी वनडे मालिकेतील शेवटच्या साखळी सामन्यात १०१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सगल दोन सामन्यातील पराभवानंतर भारताने हा मोठा विजय मिळवला आहे. या मालिकेत भारताचा हा दुसरा विजय आहे. त्यामुळे भारताचे ४ गुण झाले असून नेट रन रेटही चांगला आहे. त्यामुळे भारताने आता अंतिम सामन्यासाठी दावेदारी ठोकली आहे.

या सामन्यात भारतीय अ संघाने अफगाणिस्तान अ संघासमोर ३२० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने ३६.५ षटकात सर्वबाद २१८ धावा केल्या. अफगाणिस्तानचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com