

Tilak Varma
Sakal
Tilak Varma Injury Updates: भारतीय संघासाठी पुढचे दोन महिने महत्त्वाचे आहेत. फेब्रुवारी-मार्च दरम्यान टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा भारताला खेळायची आहे. त्यापूर्वी जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी२० मालिका खेळली जाणार आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघाला (Team India) मोठा धक्का बसला आहे.
२३ वर्षीय खेळाडू तिलक वर्मा (Tilak Varma) आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांतून बाहेर झाला आहे. याबाबत बीसीसीआयने (BCCI) अधिकृत माहिती दिली आहे.