Tilka Verma : वन डे वर्ल्ड कपसाठी जोरदार तयारी; तिलक वर्माच्या शतकी खेळीने संघाने मिळवली आघाडी, ५ बाद ८० वरून जोरदार मुसंडी

Tilak Varma News: दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात तिलक वर्माने ५ बाद ८० अशा अडचणीच्या परिस्थितीत नाबाद ११६ धावांची शतकी खेळी केली. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे दक्षिण विभागाला ९० धावांची आघाडी मिळाली असून २०२७ वनडे वर्ल्ड कपसाठी तिलकच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
Tilka Verma

Tilka Verma

esakal

Updated on

Tilka Verma : वनडे वर्ल्ड कप २०२७ साठी भारतीय संघाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, अश्यातच आता, दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात तिलकने पुन्हा एकदा आपली फलंदाजीची ताकद दाखवून दिली आहे. दक्षिण विभागाची अवस्था ५ बाद ८० अशी झाल्यानंतर तिलक वर्माने संयमी फलंदाजी करत नाबाद शतक झळकावलं आणि संघाला थेट आघाडी मिळवून दिली.

दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात दक्षिण विभागासमोर उत्तर विभागाचं आव्हान आहे. उत्तर विभागाने पहिल्या डावात १९५ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण विभागाची सुरुवात मात्र अडचणीची झाली. ८० धावांवरच संघाचे पाच फलंदाज माघारी परतले. त्यावेळी तिलक वर्माने डावाची सूत्रं आपल्या हातात घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com